शब्दांवाचुन तुला कळावे

अशीच यावी वेळ एकदा स्वप्नी देखील नसताना ,
असे घडावे अवचित काही, तुझ्या समिप मी असताना

अशाच एका संध्याकाळी एकांताची वेळ अचानक ,
जवळ नसावे चीट्ट्पाखरू केवळ तुझी नि माझी जवळिक

संकोचाचे रेशीमपडदे हां हां म्हणता विरून जावे ,
समय सरावा मंदगतीने अन प्रीतीचे सूर जुळावे

मी मागावे तुझियापाशी असे काहीसे निघताना ,
उगीच करावे नको नको तू हवेहवेसे असताना

शब्दांवाचुन तुला कळावे गूज मनी या लपलेले ,
मुक्तपणे तू उधळून द्यावे जन्मभरी जे जपलेले

– प्रसाद कुलकर्णी

Advertisements
Posted in Songs

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: